जर्मीनेटर

जर्मीनेटर

जर्मीनेटर तयार करण्याचे कारण ?
आपण मका मोड येण्यासाठीचा वेळ कमी करणे याचे कारण आहे .
मकेला मोड येण्यासाठी पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये तापमानाचे प्रमाण कमी असते त्यामुळे मोड येण्यासाठी आपण गोनपाटात दडपून रूम टेंम्परेचेरला ठेवतो.यामुळे मोड यायला  48 तास किंवा त्यापेक्षा जास्त तास लागत होते. त्या माकेला चिकटपणा येतो, त्यामुळे बुरशी त्यावर लवकर येते.

जर्मीनेटर कसा आहे ?
जर्मीनेटर हा पूर्णपणे स्वयंचलित आहे यामध्ये पाणी आणि तापमान याचे सेंसर बसवलेले आहेत. यामुळे ८०%पेक्षा कमी आद्रता झाली तर आपोआप पाणी फवारले जाते आणि तापमान 28 % पेक्षा कमी तापमान झाले कि हिटिंग चालू होते. हा जर्मीनेटर हवाबंद आहे.
   जर्मिनेटरचे कार्य 
जर्मीनेटर हा माकेला लवकर कोंब येण्यासाठी मदत करते. आद्रतेचे प्रमाण आणि उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लवकर कोंब येतात .यामध्ये गहू,ज्वारी,मका,बाजरी,यांचा उपयोग करता येतो. 

जर्मीनेटर हा स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो. 

Comments

Popular posts from this blog

माती परीक्षण