aquaponic

                                                          aquaponic
    aqua म्हणजे पाणी ponic म्हणजे शेती म्हणजेच पाण्यावरची शेती यामध्ये असे केले जाते कि दोन लहान शेततळे असतात. एका तळ्यामध्ये मासे पाळायचे आणि दुसर्या तळ्यामध्ये पाणी ठेवायचे. तळ्याच्या वरच्या बाजूला खडक,वाळू,विटा,यापासून तयार करायचे म्हणजे त्यामध्ये पाणी सोडले तर ते पाणी खालच्या बाजूला यावे. माश्यांच्या तळ्यामध्ये असलेले पाणी हे त्यावरती तयार केलेल्या बेडवर दोन दिवसांनी सोडून द्यायचे.
पाणी फिरवण्याची पद्धत मोठ्या तळ्यामधून पाणी लहान तळ्यामध्ये सोडले जाते. लहान तळ्यातून पाणी बेडवर सोडले जाते असे दोन दिवस चालू असते. तिसऱ्या दिवशी पाणी बदलले जाते .

  • पाणी बदलले का जाते ?
मास्यांच्या विष्ठेमध्ये नत्राचे प्रमाण असते.त्यामुळे पाण्यामध्ये नत्राचे प्रमाण वाढले कि ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते. म्हणून पाणी बदलेले जाते. हे पाणी बेडवरची अळू शोषून घेते आणि त्यावरती वाढते . पाणी परत तळ्यामध्ये जाते . त्यामध्ये हवेतील ऑक्सिजन मिसळला जातो.
  • अश्या प्रकारे पाण्यावर शेती आणि मत्स्य पालन केले जाते.

Comments

Popular posts from this blog

माती परीक्षण

जर्मीनेटर